एड्सग्रस्त मुलांना शिक्षणासाठी विरोध

एड्सग्रस्त मुलांना शिक्षणासाठी विरोध

बीड, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: एचआयव्हीग्रस्त मुले जिल्हा परिषद शाळेत नको म्हणून बीडच्या पाली गावातील पालकांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पालकांनी थेट जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला. बीड तालुक्यातील पाली गावात इन्फंट इंडिया या एचआयव्ही बाधितावर काम करणाऱ्या संस्थेतील मुले शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा पाली येथे येत होती. मात्र या मुलांमुळे आमच्या मुलांना धोका होईल या भीतीपोटी पालकांनी शाळा बंद केली असून या मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा अशी मागणी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version