नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’ला विरोध

नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’ला विरोध

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : बहूप्रतिक्षीत आदिपुरुष हा चित्रपट आज (१६ जून रोजी) देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यामुळेच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये बरीच गर्दी झाली. अशातच एकीकडे चित्रपटाला उत्तुंग प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे या चित्रपटाबाबत नेपाळमध्ये बराच गदारोळ झाला आहे.

नेपाळमध्ये आदिपुरुष या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. हे प्रकरण पाहता नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’चे प्रदर्शन आणि प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली जाऊ शकते असे म्हंटले जात आहे.

काय आहे हा संपूर्ण वाद?

नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी आदिपुरुष चित्रपटातील संवादाच्या एका ओळीवर आक्षेप घेतला, ज्यात सीतेला ‘भारताची मुलगी’ म्हणून दाखवले आहे. यावर त्यांनी समाज माध्यमांवर ‘सीता ही नेपाळची कन्या असावी’ असे लिहिले. तर यापुढे जर निर्मात्यांना चित्रपट नियोजित वेळेनुसार चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर ही ओळ बदलण्यासाठी तीन दिवस आहेत असे ही नमूद केले.

या आक्षेपानंतर महापौर बलेन शहा यांनी हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या सगळ्याचा ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर कसा परिणाम होईल हे पाहावे लागेल.

महापौर बलेन यांनी ट्विट करून आपला निषेध व्यक्त केला आणि म्हटले की, “जोपर्यंत दक्षिण भारतीय चित्रपट ‘आदिपुरुष’मध्ये असलेला ‘जानकी भारत की बेटी है’चा नारा केवळ नेपाळमध्येच नाही तर भारतातही चुकीचा घोषित केला जात नाही. तोपर्यंत काठमांडू शहरात कोणत्याही हिंदी चित्रपटाला परवानगी दिली जाणार नाही. ती दुरुस्त करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जय माता सीता.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version