यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी – शरद पवार

यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी – शरद पवार

पुण्यात शनिवारी साखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर्षी देशात साखरेचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात झाले असल्याचे सांगितले. मात्र, यात आनंद न मानता शेतकऱ्यांनी पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन पवारांनी दिले आहे.

साखर परिषदेत शरद पवार म्हणाले, पुढील वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे ऊस तोडणीचे नियोजन लागवडीपासून करावे लागणार आहे. यावर्षी पाणी आणि पाऊस समाधानकारक असणार आहे. त्यामुळे यावेळी उसाचे उत्पादन वाढणार असून यंदा विक्रमी साखर निर्यातीची संधी असल्याचे शरद पवार यांनी साखर परिषदेत सांगितले आहे. तसेच यावर्षी भारतातून १२१ देशात साखर निर्यात करण्यात आली आहे. असे कधीही झाले नसून उसाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झाले असल्याची माहितीही शरद पवारांनी साखर परिषदेत दिली आहे.

‘आपल्या राज्यात ऊस वगळून इतर पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी उसाकडे वळतात. मात्र, ऊस पिकवताना प्रति एकर उत्पादन वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी प्रत्येक कारखान्याने ऊस विकास योजना राबविण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.’

पुण्यातील साखर परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंभुराजे देसी, मंत्री सतेज पाटील यांसह अनेक नेते आणि साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपस्थित होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version