ऑनलाईन वेबसाईटवर आपल्या जीवनाचा जोडीदार शोधणाऱ्या महिलांना ‘त्याने’ घातला लाखो रुपयांचा गंडा

ऑनलाईन वेबसाईटवर आपल्या जीवनाचा जोडीदार शोधणाऱ्या महिलांना ‘त्याने’ घातला लाखो रुपयांचा गंडा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऑनलाईन वेबसाईटवर आपल्या जीवनाचा जोडीदार शोधणाऱ्या महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह करणाऱ्या भामट्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

आहेत.

 

संजय वर्मा असं या भामट्याचं नाव आहे. लखोबानं पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर पाच महिलांशी विवाहचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला.

 

अशा तक्रारी चितळसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. भामट्या लाखोबा महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क करायचा.

 

पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला आणि एक मुलगा आहे अशी महिलांना थाप मारून जाळ्यात ओढायचा. चांगली नोकरी आणि व्यवसाय असं आमिष दाखवून

महिलांशी विवाह करून रक्कम उकळायचा.

 

आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केलीय याचा अधिक तपास ठाणे पोलीस करत आहे. तसेच लाखोबाला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात

आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version