ऑनलाईन बेटिंग अधिकृत होणार?

ऑनलाईन बेटिंग अधिकृत होणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकार ऑनलाईन बेटिंग अधिकृत करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

क्रीडा मंत्रालयानं याबाबत अनेकांशी चर्चाही केल्याची माहिती मिळत आहे.

 

क्रीडा मंत्रालय ब्रिटनमधील अधिकृत आणि कायदेशीर ऑनलाईन बेटिंगसंदर्भात मार्गदर्शन घेणार आहे. क्रीडा सचिव इंजेती श्रीनावस सध्या इंग्लंडमध्येच असून ते

इंग्लंडशी याबाबत सामंजस्य करार करण्याचीही शक्यता आहे.

 

इंग्लंडमध्ये ऑनलाईन बेटिंगबाबत प्रभावी कायदे आहेत. भारतातही तसं शक्य असेल, तर ऑनलाईन बेटिंग अधिकृत केली जाईल, असं क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी

म्हटले.

 

ऑनलाईन बेटिंग भारतातील खेळाच्या विकासासाठीही फायदेशीर ठरणार आहे. कारण अधिकृत बेटिंगवर जो कर लावला जाईल. तो सरकारला मिळेल. त्यामुळे सरकार

याबाबत गांभार्याने विचार करत आहे, असं क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version