महाराष्ट्रतील कांदा थेट दुबईत

महाराष्ट्रतील कांदा थेट दुबईत

नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते. आता कांदा निर्यातीत धुळे जिल्ह्यानेही आघाडी घेतली आहे. धुळे तालुक्यातील कांदा थेट दुबईला निर्यात करण्यात येत आहे. दोन कंटेनर भरून कांदा दुबईकडे रवाना कारण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा उत्पादीत केल्याने त्याची थेट निर्यात होत आहे. खानदेशातून पहिल्यांदाच थेट दुबई येथे कांदा निर्यात झाला आहे. खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीतून सफेद कांदा दुबईत निर्यात होत आहे. विशेष म्हणजे हा कांदा धुळ्यात एसी कंटेनरने सुमारे २९ टन कांदा दुबईकडे रवाना झाला. या कांद्याला चांगला भाव मिळाला असून, यापुढे देखील सफेद कांद्याची निर्यात केली जाणार आहे.

जिल्ह्याच्या परिसरात आणि शेतकरी कांदा लागवड करतात. उत्तम प्रतीचा कांदा उत्पादीत केला तर तो थेट दुबईला पाठवता येतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्तम कांदा उत्पादनाकडे लक्ष देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. यापूर्वी देखील धुळे शहरातून कांदा विदेशात गेला आहे. मात्र तो लहान गाड्यांद्वारे मुंबईला आणि तेथून तो व्यापाऱ्यांमार्फत इतर देशात पाठवला जात असतो. मात्र पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीत एसी कंटेनरने हा कांदा थेट दुबईला गेला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version