गेल्या तीन दिवसापासून येवला तालुक्यात सह परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला याचा फटका बसत आहे. यावेळी पावसामुळे, कांदा पिकावर कारपा, मावा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महागडी औषधे फवारूनही काही उपयोग होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे महागडी औषध फवारले नंतर औषध धुवून निघून जात असल्याने कोणताही परिणाम या पिकांवर होत नाही.
परिणामी मावा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने कांडा उत्पादनात नक्की मोठ्या प्रमाणात घाट होणार असल्याची भीती कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने औषधांच्या वाढत्या खर्चाने शेतकरी बेजार झाले आहेत.
वारंवार फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने पळशी परिसरात अनेकांचे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. रोगामुळे कांद्याच्या पाती वाकड्या होऊन पिवळ्या पडल्या आहेत. कांद्याची वाढ थांबून पीक जळू लागले आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.