कांदा लिलाव राहणार ठप्प

कांदा लिलाव राहणार ठप्प

नाशिक, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकारने निर्यातीच्या कांद्यावर ४० टक्के कर लागू केला आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी व्यापारी संघटनांनी बंद पुकारला आहे. या बंदला किसान सभा तसेच इतर शेतकरी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांद्याचा लिलाव ठप्प आहे. सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचा लिलाव बंद आहे. याचा परिणाम कांद्याच्या विक्रीवर होत आहे.

बाजार समित्यांच्या बंदवर तोडगा काढण्यासाठी आज सकाळी ११ वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील बाजार समित्यांचे सभापती आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version