जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 1200 ते 1300 रुपयां पर्यंत भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कांद्याचे भाव आज मोठ्या प्रमाणात घसरल्याने कांदा निर्यातमूल्य रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. मागच्या आठवड्यात कांद्याला 2900 रुपये भाव मिळाले होते.
आज मात्र, 1300 रुपयाने भाव घसरल्याने कांद्याला फक्त 1500 ते 1600 रुपये भाव मिळाले.
जिल्ह्यातील मुख्य बाजार समिती असलेल्या लासलगावसह सर्व बाजार समिती मधे कांद्याचे दर आज घसरल्याचं पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.