OnePlus Nord 6 मध्ये मिळणार 9000mAh ची अवाढव्य बॅटरी; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये हा फोन दमदार फीचर्ससह बाजारात उतरणार आहे.
OnePlus Nord 6 मध्ये मिळणार 9000mAh ची अवाढव्य बॅटरी; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून OnePlus नवीन OnePlus Nord 6 7 एप्रिल रोजी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत लॉन्चपूर्वीच या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक झाल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लीक माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा प्रोसेसर हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सक्षम मानला जातो.

विशेष म्हणजे, फोन 165fps गेमिंग सपोर्ट करेल, असा दावा करण्यात येत असून, त्यामुळे 165Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Crime News: तीन वेळा आईस्क्रीम खाल्लं, मग अचानक झाला वाद; रागाच्या भरात तरुणावर भीषण हल्ला, अन् मग मृतदेहाचे तुकडे चुलीत टाकून…

या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची मोठी 9000mAh बॅटरी असू शकते. इतकी मोठी बॅटरी दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरेल आणि वारंवार चार्जिंगची गरज कमी करेल. यासोबत 80W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगचा सपोर्टही दिला जाऊ शकतो.

कॅमेरा विभागातही हा फोन आकर्षक ठरू शकतो. यात 50 मेगापिक्सलचा Sony LYT-600 सेन्सर OIS सपोर्टसह दिला जाऊ शकतो. याशिवाय 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी लेन्स आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजमुळे फोनची स्पीड आणि परफॉर्मन्स अधिक सुधारेल.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, OnePlus Nord 6 ची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30000 ते 35000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्यामुळे हा फोन मिड-प्रीमियम सेगमेंटमध्ये येणार असून, इतर हाय-परफॉर्मन्स स्मार्टफोन्सशी त्याची थेट स्पर्धा होणार आहे. हा स्मार्टफोन विविध अशा आकर्षक रंगांमध्ये सादर केला जाऊ शकतो. 

हेही वाचा: Coconut Water: नारळपाणी पिताय? थांबा! 'या' गंभीर आजारांमध्ये नारळपाणी ठरू शकतं विषासमान

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version