फक्त एका रुपयाच्या कर्जासाठी शेतकऱ्याला धरलं वेठीस

फक्त एका रुपयाच्या कर्जासाठी शेतकऱ्याला धरलं वेठीस

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

बुलडाण्याच्या मलकापूर तावलुक्यातील एका शेतकऱ्याला फायनान्स कंपनीने फक्त एक रुपयासाठी वेठीस धरलंय. आधी 1 रूपयाचा भरणा करा त्यानंतर एका महीन्याने नाहरकत प्रमाणपत्र देऊ, असा अजब फतवा या कंपनीने काढलाय.

जगदिश कांडेलकर असं या शेतकऱ्याचं नाव असून सहा लाख पन्नास हजारांना याचं कंपनीकडून फायनान्स करून घेतला होता. तर, कंपनीने कर्जापोटी दिलेल्या हप्त्यानुसार सर्व हप्तेही भरले.

दरम्यान मोठेबाबांच्या किडनी आजाराच्या उपचारासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी कंपनीकडे केली होती. मात्र तुमच्या कडे 1 रूपया पुन्हा कर्जरूपी निघत असून ते भरा नंतर तुम्हाला एका महीन्याने नाहरकत प्रमाणपत्र देऊ, असा अजब फतवा त्या फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांला सांगितलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version