एकाच पानावर पाहा 1500 वर्षांचे कॅलेंडर; सिंधुदुर्गच्या अवलियाची किमया

एकाच पानावर पाहा 1500 वर्षांचे कॅलेंडर; सिंधुदुर्गच्या अवलियाची किमया

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

कॅलेंडर म्हटलं की आपल्यासमोर 1 वर्षांचं 12 पानी कॅलेंडर किंवा फार फार तर एका वर्षाचं एका पानाचं कॅलेंडर. मात्र, एका पानात 1500 वर्षांचं कॅलेंडर कधी विचारही

केला नसेल. आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही ते प्रत्यक्षात साकरलंय सिंधुदुर्गच्या अवलियाने.

 

अरविंद राणेंनी 1600 ते 3 हजार सालापर्यंतचं कॅलेंडर बनवल आहे. या कॅलेंडरसाठी त्यांनी 12 वर्ष मेहनत घेतली आणि त्यांना त्याचं फळही मिळाले.

 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आआणि युकेच्या वर्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्याची नोंद झाली.

 

राणे कुडाळमध्ये जिप बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत. लहानपासूनच संशोधक वृत्ती असल्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा त्यांचा छंद

आहे.

 

त्यातूनच त्यांनी या अनोख्या अशा कॅलेंडरची किमया साधली. इंडिया बुकमधील विक्रमानंतर त्यांच्या या कॅलेंडरची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version