बारावीचा पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक

बारावीचा पेपरफुटीप्रकरणी आणखी एकाला अटक

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच पेपर फुटल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली. त्यानंतर शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. याची चर्चा विधीमंडळातही झाली. त्यानंतर या प्रकऱणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. आता या प्रकरणात आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बारावीच्या गणित विषयाच्या पेपर फुटीप्रकरणी आणखी एका आरोपीला गुरुवारी रात्री एसआयटी पथकाने अटक केली असून आतापर्यंत याप्रकरणात आरोपींची संख्या आठ वर गेलीय. यामधे आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचीही माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. अटक केलेल्या आरोपींचे नाव दानिश खा फिरोज खा पठाण असून तो शेंदुर्जन येथील रहिवासी आहे. एसआयटी पथकाकडून याप्रकरणी अनेकांची चौकशी सुरू आहे. याच्या आधी बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version