ब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता…

ब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

तुमच्या मुलांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ब्ल्यू व्हेल गेमच्या जाळ्यात मुलं चांगलीच अडकली आहेत. ब्ल्यू व्हेल गेमनं आता ग्रामीण भागातही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

 

ब्ल्यू व्हेल गेममुळे सोलापूरातल्या एका 14 वर्षाच्या मुलानं जीव गमावला असता. पण पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यानं या मुलाचा जीव वाचला. सोलापूरचा एक मुलगा ब्ल्यू व्हेल गेमचं टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

भिगवण पोलीस स्टेशनच्या एन एम राठोड यांना तातडीनं भिगवण एस टी स्टँड गाठलं. पुण्याला जाणाऱी बस सुटण्याच्या आत त्यांनी मुलाला ताब्यात घेतलं. गेले कित्येक दिवस हा मुलगा ब्ल्यू व्हेल गेम खेळत असल्याचं समोर आलं.

 

मुंबईच्या अंधेरीत नुकतंच एका मुलानं ब्ल्यू व्हेल गेमपायी आत्महत्या केली होती. त्यामुळे हा धोका आता सर्वसामान्यांच्या घरात येऊन पोहोचला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version