सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले ‘विशेष’ बाळ

सोलापूरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मले ‘विशेष’ बाळ

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

सोलापूरमध्ये दोन तोंडं आणि एक शरीर असलेल्या बाळाचा जन्म झालाय. छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल रुग्णालयात या बाळाचा जन्म झालाय. सिव्हिलमध्ये अशा प्रकारचे बाळ पहिल्यांदाच जन्मल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे.

स्त्री जातीच्या या बाळाला दोन तोंडे असून शरीर मात्र एकच आहे. एक लाख प्रसूतीमागे एखादे बाळ अशाप्रकारे जन्म घेतं. बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम इतके आहे. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version