गुरुदास कामत यांना आज अखेरचा निरोप…

गुरुदास कामत यांना आज अखेरचा निरोप…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री गुरुदास कामत यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. कामत यांचं पार्थिव रात्री दिल्लीहुन विमानाने मुंबईत आणण्यात आलं. नारायण राणे, आशिष शेलार, कृपाशंकर सिंग तसेच भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुदास कामात यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं.

विमानतळावरून कामत यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणलं तेव्हा शेकडो कार्यकर्ते हजर होते. त्याच बरोबर भाजपचे कॅबिनेट मंत्री प्रकाश मेहता,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,माजी मंत्री नसीम खान यावेळी हजर होते.

आज सकाळी 8.30 ते 10.30 पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर चेंबूरच्या स्मशान भूमीवर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत याचं निधन

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version