ओंकारचे प्रेमावर असे मत

ओंकारचे प्रेमावर असे मत

हास्य जत्रा या शो मधून प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.हास्य जत्रेमुळेओंकार बराच गाजलात्यांनतर त्याने चित्रपट सृष्टीकडे वाटचाल सुरु केली. यासाठी प्रेक्षकांनी त्याचे तोंडभरून कौतुकही केले आणि टीका ही केल्या. त्याने या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ‘हौस आकाशी उंच उडायची’ म्हणत झेप घेतली आणि ‘सरला एक कोटी’सारखा सुपरहिट चित्रपट केला.

त्यानंतर आता तो ‘करून गेलो गाव’ या धम्माल घालणाऱ्या मालवणी नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या नाटकाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.ओंकारच्या चाहत्यांनी आता हे ‘हाऊसफुल्ल’ सुद्धा केले आहे. या व्यतिरिक्त ओंकारच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना खूप रस आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्याने एक खुलासा केलाय. ज्या वेळी ओंकार ला प्रेमाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने अतिशय सुंदर असे उत्तर दिले. तो म्हणाला ,”प्रेम हे ठरवून होत नाही आणि मला ते कधी झालं नाही. मी आधीही कधी या सगळ्याच्या मी पहिल्यापासूनच या सगळ्याच्या भानगडीत कधी पडलो नाही. मी सगळं काही माझ्या घरच्यांवर सोडू दिले आहे. आणि माझ्या मित्र परिवाराने ही याची जबाबदारी घेतल्याने त्याचा विचार करण्याची आता काही गरज नाही.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version