आयएनएस विक्रांत संदर्भात जुना फोटो ट्विट

आयएनएस विक्रांत संदर्भात जुना फोटो ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ईडीने कारवाई जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर विक्रांत युद्धनौकेत ५८ कोटी रक्कम लाटली असल्याचा आरोप केला. विक्रांत युद्धनौका घोटाळा प्रकरणी किरटी सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, २०१३साली किरीट सोमय्यांकडून ट्विट केलेला आयएनएस विक्रांत संदर्भातील जुना फोटो व्हायरल होत आहे.

किरीट सोमय्यांकडून ट्विट झालेला आयएनएस विक्रांत युद्धनौका संदर्भातील जुना फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. हा फोटो २०१३ सालचा असल्याचा उल्लेख फोटोमधील ट्विटमध्ये होत आहे. आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी तत्कालिन राष्ट्रपतींची भेट घेतली असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत हेदेखील आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचले नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे

सोमय्यांवर गुन्हा दाखल

किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत जमा झालेले कोट्यवधी रुपये राज्यपालांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यपालांना न देता स्वत:च लाटले असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version