जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
नोटाबंदीच्या काळात ज्यांना काही कारणामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून घेता आल्या नाहीत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या मुद्द्यावरून फटकारले आहे. नोटा बदलीसाठी आणखी एक संधी दिली जाऊ शकते का याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला आपले म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
एखाद्याचा घामाचा पैसा तुम्ही असाच व्यर्थ कसा जाऊ देऊ शकता?, असे खडे बोल आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले. खरोखर ज्यांची नोटा जमा न करण्याची कारणे अपरिहार्य होती, त्यांच्या प्रकरणांचा अभ्यास करता येईल असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायलयाला सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.