ओला-उबर कंपन्याविरोधात मनसेचं आंदोलन

ओला-उबर कंपन्याविरोधात मनसेचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ओला आणि उबर कंपन्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केले आहे. 

रस्त्यावर ओला, उबरच्या ज्या गाड्या दिसतील, त्यांना मनसेचे कार्यकर्ते धमकावत आहेत. सायन चुना भट्टीमध्ये मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गाड्यांची तोडफोड करून आंदोलनाला सुरवात केली.

अनेक मुंबईकर ओला किंवा उबरने प्रवास करतात. मुंबईत ओला, उबरचे 30,000 चालक आहेत. त्यामुळे याचा जबर फटका मुंबईकरांना बसणार आहे. हा संप लक्षात घेता मुंबईकरांच्या सोईसाठी अतिरिक्त बसेस आणि टॅक्सींची सोय करण्यात आली आहे. हायब्रीड एसी बसचा पर्यायही मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version