ओखी वादळाचा धुमाकूळ; कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतील 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर

ओखी वादळाचा धुमाकूळ; कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतील 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर

वृत्तसंस्था, केरळ

 

केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर ओखी वादळाने धडक दिलीये. सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातलाय.

या वादळाच्या दरम्यान अनेक मच्छिमार बेपत्ता झालेत. तब्बल 218 मच्छिमारांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि नौसेनेला यश आलंय.

दरम्यान, पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतल्या 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आलीये.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version