वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ओखी चक्रीवादळात तामिळनाडू आणि केरळातील 29 जणांचा मृत्यू झाला असून 167 मच्छीमार बेपत्ता आहेत. या वादळाचा प्रभाव कमी झाला असून ते गुजरातकडे सरकले असल्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीचा धोका टळलाय.
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. बचाव पथकाने 556 मच्छीमारांना वाचविलंय. तामिळनाडू आणि केरळचे बोटींसह वाहून गेलेले 809 मच्छीमार किनाऱ्यावर पोहोचलेयेत. लक्षद्वीपमधील 33 पर्यटक सुरक्षितयेत.
चक्रीवादळाने गुजरात, दमण, दीव व दादरा नगर हवेली येथे मोठ्या नुकसानाची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.