ओखी वादळामुळे आपत्तीजनक परिस्थिती येऊ नये यासाठी BMC, सरकार आणि रेल्वे प्रशासन सज्ज

ओखी वादळामुळे आपत्तीजनक परिस्थिती येऊ नये यासाठी BMC, सरकार आणि रेल्वे प्रशासन सज्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ओखी वादळ आता उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाच्या तुरळक सरी सुरू आहेत. म्हणूनच कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती येउ नये यासाठी महानगरपालिका, सरकार आणि रेल्वे प्रशासन सज्ज झालय.

 

नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

– रेल्वे रूळांवर पाणी साचू नये आणि साचल्यास त्यावर लक्ष ठेवण्यास पश्चिम रेल्वेच्या अभियांत्रीकी नियंत्रित विभागाला सूचना

– गर्दीची स्थिती नियंत्रित करणे आणि स्थानकावर आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये याची खातरजमा

– कोणतीही आपत्ती उद्भवल्यास सज्ज राहण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विशेष गटाची सोय

– कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपतकालीन गट खुले

– स्थानकांवर 250 पेक्षा अधिक रेल्वे पोलीस यंत्रणा आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा यंत्रणा तैनात

– रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने कर्मचारी वर्ग देखरेखीसाठी तैनात

– यंत्रणेत बिघाड झाल्यास तात्काळ उपकरणांची गस्त

– नागरिकांसाठी 70 शाळांचे सभागृह खुले

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version