ओखीची भिती; मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी

ओखीची भिती; मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्राला ओखी वादळाचा तडाखा बसण्याची भिती वर्तवली जात आहे. कोकणासह मुंबईत अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.  

ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या (मंगळवार 5 डिसेंबर) मुंबईसह परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज मध्यरात्रीपासून मुंबईत सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्र किनारी मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version