मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी दुर्घटना घडली आहे. ऑईल टँकरला भीषण आग लागली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून या आगीत तिघांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमीझाले आहेत.
आगीचा भडका उडाल्याने द्रुतगती महामार्ग आणि त्याखालून जाणारा महामार्ग या दोन्ही महामार्गावर या आगीच्या झळा पोहचत आहेत. जखमींना रुग्णालयात पोहचवण्यात आले आहे. केमिकलचा टँकरला खंडाळा घाटात आग लागली असून या घटनेत टँकरचा चालक जागीच ठार झाला असून क्लिनर जखमी झाला आहे. परंतु, अद्याप हा अपघात कसा घडला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये.
या आगीमुळे महामार्गावर थांबवण्यात आलेली वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करतील असे माहिती पोलिस अधिक्षक लता फड यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.