पदवीधर मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्याचा मृत्यू

पदवीधर मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्याचा मृत्यू

अमरावती मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीत पदवीधर मतमोजणी केंद्रावर अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मतमोजणी करणाऱ्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. २ फेब्रुवारीच्या सकाळपासून मतमोजणी केंद्रावर सेवा देत होते. मध्यरात्री अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान शाहूराव खडसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अमरावतीच्या नेमानी गोडावून येथे घटना घडली आहे. पदवीधर निवडणूतिची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र याला थोड्या प्रमाणात कुठे तरी गालबोट लागले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मतदान केंद्रावरून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्तव्यावर असताना त्यांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विभागीय आयुक्त समवेत सगळ्या कर्मचाऱ्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहलेली आहे. नेमका मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला का याचा शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र प्राथमिक अंदाज त्यांना हृदयविकारा झटका त्यांना आला असावा आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version