‘पंचवीस दिवसात ओबीसींची सूक्ष्मतम नोंद शक्य’

‘पंचवीस दिवसात ओबीसींची सूक्ष्मतम नोंद शक्य’

राज्यसभेच्या सहाव्या उमेदवारीसाठी संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यास संभाजीराजे यांनी नकार दिला आहे. तसेच राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. अशातच आता, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सहाव्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे. राठोड यांनी संजय राऊतांशी भेट घेत ही मागणी केली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यंत्र्यांकडे ओबीसीच्या नेत्यांसाठी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मागणी केली आहे. निवडणूकींच्या वेळी ओबीसींनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. माझ्या स्वतंत्र्य १० ते १२ सभा पार पडल्या. त्यात काँग्रेसचे उमेदवार पडले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच पाहिजे होता. आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा हक्क आहे. असे हरिभाऊ राठोड यांनी संजय राऊत यांच्या भेटीदरम्यान सांगितले. हा सर्व निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्या, असे त्यांनी राऊतांना सांगितले. तसेच आम्ही आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला, आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाले, आता आमचा विचार केला नाही, तर जय महाराष्ट्र असेही हरिभाऊ राठोड म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी इम्पॅरिकल डेटा गोळा करण्यास २५ दिवसांचा कालावधी लागू शकतो असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. दरम्यान, घाईत ओबीसींची नोंदणी करताना चुका झाल्यास गोळा केलेला तपशील न्यायालयात टिकणार नाही, अशी भीती ओबीसी आरक्षण याचिकाकर्ता विकास गवळी यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे दूरध्वनीद्वारे व्यक्त केलीय

ओबीसींची सूक्ष्मतम नोंद म्हणजे काय?

सुक्ष्मतम नोंद म्हणजे प्रत्येक गावात, प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन त्या त्या प्रभागाच्या मतदान याद्या घेणे आणि त्या मतदान याद्यांमधून ओबीसी वेगळे करावे. अशाप्रकारे ओबीसींचे एकुण लोकसंख्येचं प्रमाण ठरवलं जातं. तसेच ओबीसीचं मागासले पदसुद्धा ठरवले जाते, यास सूक्ष्मतम नोंद असे म्हणतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version