महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथविधीचा कार्यक्रम विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला.
या शपथविधीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षाच्या एकूण 36 जणांनी शपथ घेतली .
या 36 जणांपैकी 26 जणांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली. तर 10 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांची देखील राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. तसेच मंत्रिमंडळात 3 महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
अशोक चव्हाण
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
विजय वडेट्टीवार
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
वर्षा गायकवाड
डॉ. राजेंद्र शिंगाणे
नवाब मलिक
राजेश टोपे
सुनिल केदार
संजय राठोड
गुलाबराव पाटील
अमित देशमुख
दादा भुसे
जितेंद्र आव्हाड
संदिपान भुमरे
बाळासाहेब पाटील
यशोमती ठाकूर
अनिल परब
उदय सामंत
के.सी. पाडवी
शंकरराव गडाख
असलम शेख
आदित्य ठाकरे
राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नेते
अब्दुल सत्तार
सतेज पाटील
शंभुराजे देसाई
बच्चू कडू
विश्वजीत कदम
दत्तात्रय भारणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
राजेंद्र पाटील येड्रावकर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.