मलिष्काच्या घरात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, महापालिकेनी बजावली नोटीस

मलिष्काच्या घरात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, महापालिकेनी बजावली नोटीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई महापालिकेच्या कारभारावर “मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय,” असं म्हणत ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काविरुद्ध शिवसेनेने मोहीमच उघडली आहे.

 

मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. मुंबई मनपाने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली.

 

यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली. याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version