अशासकीय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा संप

अशासकीय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा संप

महाराष्ट्रातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील भवन महाविद्यालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपात महाविद्यालयातील शंभरहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे.

आश्वासित प्रगत योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू झाला त्यादरम्यानची फरकाची थकबाकी आणि १४ १० विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करावा, विद्यापीठआणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसह इतरही अनेक मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी गुरुवारी हा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version