युद्ध नको, शांतता हवी; रशियात निघाले मोर्चे

युद्ध नको, शांतता हवी; रशियात निघाले मोर्चे

रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम आहे. मात्र, ‘युद्ध नको, शांतता हवी’ यासाठी रशियात जागोजागी मोर्चे निघाले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर रशियातील सेंट पीटर्सबर्ग, मास्कोमध्ये युद्धाच्या विरोधात हजारो रशियन नागिरक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग, मास्कोमध्ये युद्धाच्या विरोधात अनेक नागरिक निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, रशियातील ५३ शहरांतील तब्बल १ हजार ७९२ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ९४० आंदोलनकर्त्यांना मोस्कोमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १९७९मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत रशियाने केलेल्या आक्रमणानंतर मोस्कोत युद्धाविरोधात सर्वात मोठा मोर्चा निघाला आहे.

‘युक्रेनने माघार घेतल्यास चर्चेस तयार’

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह म्हणाले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे खोटं बोलत असून त्यांनी रशियासमोर कोणताही चर्चेचा प्रस्ताव ठेवला नाही. सध्याच्या युक्रेन सरकारला रशियाकडून लोकशाही सरकारचा दर्जा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version