पुण्यात वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

पुण्यात वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

गेल्या काही दिवसांत पुण्यातील वाहतूक व्यवस्था आणि होर्डिंगची समस्या अधिकचं चर्चेत आहे, त्यामुळे पुणे होर्डिंगमुक्त करण्यासाठी वाहतूक पोलीसांनी कंबर कसली आहे, त्यासाठी एक अभियान हाती घेण्यात आलं आहे.   

या अभियानाला महापालिकेचीही साथ मिळाली आहे, पुण्यातील 100 चौक नो व्हायलेशन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत, तर अनधिकृत होर्डिंग आणि अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

100 चौकात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी महापालिका आणि पोलीसांचं विशेष पथंक तैनात करण्यात येणार आहे.

पोलीस आणि महापालिका आयुक्त यांच्यात पुण्याच्या वाहतुकीबाबत चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे.     

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version