जय महाराष्ट्र वेब न्यूज, मालेगाव
मालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते.
याप्रकरणी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी यांना दिलासा नाहीच, हायकोर्टाने या तिघांवरील आरोप निश्चितीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
बॉम्बस्फोटप्रकरणी उच्च न्यायालयाने कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि समीर कुलकर्णी यांना दिलासा देण्यास नकार दिला.
याप्रकरणी आरोप निश्चीत करण्याची प्रकिया सुरू आहे. त्याला, स्थगिती देण्याची मागणी कर्नल पुरोहित यांच्याकडून करण्यात आली होती.
मात्र उच्च न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळला आहे. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून प्रज्ञा साध्वी, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण 11 जणांना अटक केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.