‘संजय राऊतांना कुणीही धमकी दिली नाही’

‘संजय राऊतांना कुणीही धमकी दिली नाही’

उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. दौऱ्या दरम्यान जीवाला धोका असल्याचं पत्र संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. त्यानंतर राऊत यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. तीन पोलीस कर्मचारी आणि एक पोलिसांचं वाहन सुरक्षेसाठी राऊतांच्या सोबत असणार आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांना कुणीही धमकी दिली नाही. तर, पोलीस संरक्षण वाढवण्यासाठी राऊतांची नाटंक होती, अशी टीका नितेश राणे यांनी राऊतांवर केली आहे. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी करून स्वत:चं महत्त्व वाढवावं म्हणून संजय राऊत नाटंक करत आहेत, असे नितेश राणे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत आदित्य ठाकरे या तिघांचंही संरक्षण काढावं, अशी मागणी नितेश राणे केली आहे.

उद्धव यांच्यावर टीका

दरम्यान, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंमध्ये निवडणूक लढवण्याचा कणा नाही. उद्धव ठाकरे आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवू शकत नाहीत. कणा मजबूत नसल्याने कुठली निवडणूक लढवण्याचा मुद्दाच येत नसल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यावर नितेश राणे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि अयोध्येला जाणं यावेळीच विरोधकांना कोरोनाची आठवण होते. अयोध्येला कोण जात असेल तर विरोधकांना कोरोनाची आठवण होते. त्यामुळे त्यांच्या मनात हिंदू द्वेष असल्याचे दिसते असे, नितेश राणे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version