पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द; चीनचा मोठा निर्णय

पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द; चीनचा मोठा निर्णय

पुलवामा हल्ल्यानंतर जगभारतून पाकिस्तानवर टीका करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रलिया, फ्रान्स, रशिया यासारख्या देशांनी भारताला पाठिंबा दिला. मात्र नेहमी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीननेही पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. चीनमधून पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा झटका –

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरात पाकिस्तानचा विरोध केला.

पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरोधात मोठी कारवाई करावी असे जगभरातून सांगण्यात आले.

मात्र तरीही पाकिस्तान काही कारवाई करत नसल्यानमुळे इतर देशांनी भारताला पाठिंबा दिला.

जैश संघटनेचा मसूद अजहरला सुद्धा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, अशी मागणी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे.

पुलवामा हल्ला –

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version