‘आर्यनविरोधात गुन्हेगारी कृत्याचा पुरावा नाही’; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

‘आर्यनविरोधात गुन्हेगारी कृत्याचा पुरावा नाही’; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

   क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. मात्र दर शुक्रवारी चौकशीसाठी न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने आर्यनला दिले आहेत. याचप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्वाळा केला आहे. आर्यन शाहरुख खानच्या विरोधात गुन्हेगारी कृत्याचा पुरावा नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

  आर्यनच्या मोबाईलमधील व्हॉट्सऍप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह चॅट आढळले नाही तर आर्यनविरोधात कोणताही गुन्ह्याचा पुरावा नसल्याचे उच्च न्यायालयाने निरिक्षण नोंदवले आहे. तसेच याप्रकरणी एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नसल्याचे उच्च न्यायालयान स्पष्ट केले आहे.

 आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले याबाबतचा कोणताही ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. तसेच संबंधित गुन्हा करण्यासाठी हे तिघे एकत्र आले नव्हते असे एनसीबीच्या तपासातून दिसत असल्याचे न्यायमूर्ती सांब्रे यांनी निरिक्षणात सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version