ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको – पंकजा मुंडे

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको  – पंकजा मुंडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन नगरपालिका निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे ह्या मुंबईत पत्रकार परिषदे मध्ये बोलत होत्या जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच झाल्या तर त्या अन्याय कारक ठरतील.

ओबीसी समाजाचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष होते .जाहीर झालेल्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे, मात्र मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना माझी विनंती आहे, की त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तात्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असल्याची माहिती दिली आहे. जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही बदल न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका वेळेत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना न काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version