‘जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव’

‘जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव’

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: संसदेत मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या अविश्वास प्रस्तावावर बोलताना संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव हा संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचे सांगत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत, असा हल्लाबोल शाहांनी विरोधकांवर केला. मणिपूरच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीकडून लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा सध्या सुरु आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट झालं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सरकारने त्यांच्या नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हटवली असं अमित शाह म्हणाले आहेत.

अविश्वासाचा प्रस्ताव जेव्हा तु्म्ही घेऊन येता तेव्हा तुम्ही सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात, त्यामुळे याबाबत सरकारची बाजू मांडणं गरजेचं आहे, म्हणून मी इथे उभा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तर या अविश्वास प्रस्तावावर कोणालाच विश्वास नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, ‘ जनता सगळ बघत आहे त्यांनी सगळं माहित आहे त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याची गरज नाही.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version