‘पार्टीतून दिशाला घरी नेणारी मर्सिडीज वाझेची?’ नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

‘पार्टीतून दिशाला घरी नेणारी मर्सिडीज वाझेची?’ नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत, दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत दिशा सालियन आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात संबंध असल्याचा दावा केला आहे. दिशा सालियनला पार्टीतून काळ्या मर्सिडीजमधून नेण्यात आले ती मर्सिडीज सचिन वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

नितेश राणेंनी ट्विट केले की, दिशा सालियनला ८ जून २०२० रोजी एका काळा मर्सिडीज कारमधून घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडे काळ्या रंगाची मर्सिडीज कार आहे. जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? त्यानंतर सचिन वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी रुजू कण्यात आले. याचे परस्परांशी संबंध काय? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.  तसेच दिशा सालियनची बदनामी थांबवण्याची मागणी सालियन कुटुंबियांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version