Nitin Gadkari : ‘मी कुणाला घाबरत नाही, जो लढाई सोडून पळतो तो संपतो…’; पेट्रोलियम लॉबीला नितीन गडकरींचा थेट इशारा

पुण्यात आज, शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
Nitin Gadkari : ‘मी कुणाला घाबरत नाही, जो लढाई सोडून पळतो तो संपतो…’; पेट्रोलियम लॉबीला नितीन गडकरींचा थेट इशारा

पुणे : पुण्यात आज, शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश आत्मनिर्भर झाला पाहिजे. मी याआधी देखील अनेक योजना सांगितल्या आहेत. मी योजना सांगितल्या की लोकं हसायचे आणि मला वेडा म्हणायचे, पण मी या क्षेत्रात काम करून दाखवलं. मै डंडा लेके बैठा हू, मुझे मॕनेज करनेवाला पैदा नही हुआ, अच्छा काम करो नही तो मै ठोकता हूँ…, असा टोला यावेळी नितीन गडकरी यांनी लगावला. तसेच माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबीवाले देखील मोठ्या प्रमाणात आहेत. ही लॉबी तुम्हाला म्हणजेच ग्रीन एनर्जीला नीट काम करू देईल, असं वाटत नाही. पण मी कुणाला घाबरत नाही, जो लढाई सोडून पळतो तो संपतो म्हणून भीती बाळगण्याची गरज नाही, आम्हीपण दुसऱ्याच्या छातीवर चढू शकतो. चढू, लढू, जिंकू आणि यशस्वी होऊ. तुम्ही आत्मविश्वास सोडू नका, असे त्यांनी पुढे नमूद केले. पुण्यातील ग्रीन एनर्जीच्या कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीच्या विरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली.

हेही वाचा : Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा! निर्माण होणार ‘चौथी मुंबई’; मेट्रोचे जाळे, 10 लाख नवी घरं आणि…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version