या योजनेतील ‘लक्ष्मीदर्शन’ बंद झाले पाहिजे – नितीन गडकरी

या योजनेतील ‘लक्ष्मीदर्शन’ बंद झाले पाहिजे – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह यांच्या विभागातील योजनेत भ्रष्टाचार कसा चालतो याची जाणीव करून दिली आहे. नागपुरामध्ये सुरु असलेल्या त्रिदिवसीय ऑरेंज फेस्टिवल उदघाटनाच्या वेळी गडकरींनी त्यांच्या शैलीत फटकेबाजी केली आहे.

 

ठिबक सिंचनाबद्दल केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान खूप उशिरा मिळते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हाती ते अनुदान पोहोचेपर्यंत भ्रष्टाचारामुळे ते शिल्लकच राहत नाही. अनुदान उशिरा आल्यामुळे शेतकऱ्यांना महाग साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे या योजनेतील ‘लक्ष्मीदर्शन’ बंद झाले पाहिजे. असे म्हणत गडकरींनी कृषी विभागातील गैरप्रकार केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version