महाराष्ट्रासाठी नितीन गडकरींनी केल्या खूप महत्वाच्या घोषणा

महाराष्ट्रासाठी नितीन गडकरींनी केल्या खूप महत्वाच्या घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी महाराष्ट्रासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

 

मुंबई गोवा हायवेसाठी 18 हजार कोटी, कल्याण ठाणे मुंबई महामार्ग, औरंगाबाद जालना मार्गाला मंजुरी तसेच ठाणे भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याची महत्वपूर्ण घोषणा

या बैठकीत करण्यात आली.

 

या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार,  कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक, अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे,

शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरेही उपस्थित होते.

 

सर्वात महत्वाचं म्हणजे कल्याण-ठाणे- मुंबई असा जलवाहतुकीचा प्रस्ताव यावेळी मान्य करण्यात आला. त्याबाबत लवकरच टेंडरही काढण्यात येणार आहे.

 

या प्रकल्पासाठी 2 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. 1 हजार कोटी केंद्र सरकार तर उर्वरित 1 हजार कोटी महापालिका खर्च करणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version