मी लक्ष्मी दर्शन घेत नाही आणि मी लक्ष्मी दर्शन घेऊ देणार नाही – नितीन गडकरी

मी लक्ष्मी दर्शन घेत नाही आणि मी लक्ष्मी दर्शन घेऊ देणार नाही – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माहूर येथील राष्ट्रीय महामार्ग व केंद्रीय मार्ग निधीतील प्रस्तावित कामांचं भुमीपुजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाकडे नागरिकांनी सपशेल पाठ फिरवलीय.

कार्यकमातील जवळपास अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. तीर्थक्षेत्र माहुर गडावर जाण्यासाठी रॉप-वे महाराष्ट सरकारच्या सहकार्याने तयार करणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलयं.

पण, गुणवत्ता असलेलं काम करा अन्यथा कामावर बुलडोजर फिरवू असा इशाराही गडकरी यांनी यावेळी दिलाय. लक्ष्मी दर्शन मी घेत नाही आणि मी लक्ष्मी दर्शन घेऊ देणार नाही असही त्यांनी यावेळी ठेकेदारांना ठणकावून सांगितलयं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version