डोंबिवली माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर – नितील गडकरी

डोंबिवली माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर – नितील गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

डोंबिवली हे माझ्या पाहण्यातलं घाणेरडं शहर असून, अरुंद रस्ते, घाण, अनधिकृत बांधकामं यांना लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्द्यावरुन स्वपक्षीयांचेच कान उपटले.

डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

त्यात एका विद्यार्थिनीने, डोंबिवली शहर मुंबईच्या जवळ असतानाही शहराचा म्हणावा तसा विकास का होत नाही, या विचारलेल्या प्रश्नावर गडकरींनी हे उत्तर दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version