जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवले.
बँकांनी कर्जपुरवठा करण्यास नकार दिल्याने, महामार्ग बांधणीच्या सुमारे 30 प्रकल्पांचे काम टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही सुरू होऊ शकलेले नाही.
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेल्या दिल्ली मेरठ एक्स्प्रेस-वेच्या दोन टप्प्यांचाही समावेश आहे.
देशात 2243 कि.मी. अंतराचे आणखी 29 प्रकल्प बँकांनी कर्जपुरवठयास नकार दिल्यामुळे रखडले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.