राज ठाकरेंपाठोपाठ राणेंच्या घराबाहेरही होणार फेरीवाला क्षेत्र; उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर फेरीवाले उभे करण्याचा इशारा

राज ठाकरेंपाठोपाठ राणेंच्या घराबाहेरही होणार फेरीवाला क्षेत्र; उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर फेरीवाले उभे करण्याचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत फेरीवाला क्षेत्र तयार करण्याच्या मुद्यावरुन सध्या मुंबईत राजकारण रंगू लागलय. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घराबाहेर फेरीवाला क्षेत्र घोषीत करण्यात आलंय. असे असताना आता नारायण राणेंच्या घराबाहेरही फेरीवाले बसणार असल्याचं समजतंय.

पालिकेच्या या निर्णयाला आमदार नितेश राणेंनी विरोध केलाय. तसेच मातोश्री समोर फेरीवाले कसे उभे करायचे हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय. आमच्या घराला लागून शाळा आहे. तरी देखील हॉकर्स झोन तयार करण्यात आला हे उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण असल्याची टीका काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केलीय.

कमला मिल नंतर नितेश राणे यांनी नितेश राणे यांनी आयुक्तांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. तुम्ही गरीब फेरीवाल्यांचा वापर आमच्या विरोधात करताय यावरूनच तुमचे राजकारण कळतंय असा आरोप नितेश राणे यांनी केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version