जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक झाली आहे. नितेश राणे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.
मत्स्य आयुक्तांवर मासे फेकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता सात हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर
त्यांची जामीनावर सुटका झाली.
नितेश राणेंसह कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. शिव्या देणे, जीवघेणी धमकी देणं, कार्यालयातून बाहेर पडण्यास मज्जाव करणं, गैरकायदा जमाव जमावणे
अशा आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आलेत.
पर्ससीन मासेमारीच्या अतिक्रमाणाबाबत आमदार नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेत.
मच्छिमारांच्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते मस्त्य आयुक्यांना भेटले.
पण, आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी जीआर भिरकावून देत आयुक्तांवरच मासे फेकले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.