मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला. या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.
परंतु कुडाळ पोलीस ठाणे येथे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या सुमारे दहा कार्यकर्त्यांविरुद्ध 353, 342, 143, 148, 149 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस मोठ्या फौजफाट्यासह नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कणकवली पोलीस स्थानकात हजर झाले आहेत. या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले.
कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.
या प्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
राणे यांच्या समवेत व्हिडीओ क्लिप मध्ये दिसणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्यात आली आहे.
उद्या नितेश राणेंना कोर्टात हजर केलं जाणार असून सिंधुदुर्ग एसपींनी अशी माहिती दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.