नितेश राणेंनी ‘गजनी’तील आमिरशी केली उद्धव ठाकरेंची तुलना

नितेश राणेंनी ‘गजनी’तील आमिरशी केली उद्धव ठाकरेंची तुलना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरुन टीकेचे बाण सोडले आहेत.

 

उद्धव यांचं रेखाचित्र रेखाटून त्यांची तुलना ‘गजनी’ चित्रपटातील आमीर खानच्या व्यक्तिरेखेशी केली.

 

‘गजनी’ चित्रपटातील आमीर खानने साकारलेली संजय सिंघानिया ही व्यक्तिरेखा अनेक गोष्टी विसरत असल्यामुळे शरीरावर लिहून ठेवते, त्याप्रमाणे अर्कचित्रात उद्धव

यांच्या शरीरावर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत.

 

‘भाजप आमचा मित्र पक्ष आहे’, ‘शिवसेना सत्तेत आहे’, ‘मी सत्तेत आहे’, ‘एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला विरोध’ अशा काही गोष्टी रेखाटल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version