जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणेंच्या मंत्री मंडळ प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राणेंचा मंत्रीमडळ प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.
याच पार्श्वभूमिवर नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.
नितेश राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.
नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर नितेश राणे पुढची दिशा ठरवणार असल्याचे समजते.
मुंबई काँग्रेसच्या निरुपमांना थेट आव्हान देऊन नितेश राणेंनी बदलती दिशा दाखवली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.